मोठय़ा कॉर्पोरेट कंपनीतली तगडय़ा पगाराची नोकरी सोडून शेतीकडे वळलेल्या आणि पुढे ग्रामीण जीवनपद्धतीतच रममाण झालेल्या वेंकट अय्यर यांची ही कहाणी दीपक कुळकर्णी यांनी अनुवादित केली आहे. आयबीएमसारख्या कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी असलेले अय्यर शहरातली वाढती गर्दी, कॉर्पोरेटमधली स्पर्धा, धकाधकीचं जीवन यामुळे चिंतित झाले होते. अशा वातावरणापासून दूर जाण्यासाठी त्यांनी नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या, मात्र आपल्या निर्णयावर ठाम असलेले अय्यर नव्या आव्हानांसाठी सज्ज होते. नोकरी सोडल्यानंतर त्यांनी शेतजमीन विकत घेतली. त्या जमिनीची मशागत, संपूर्णपणे रसायनविरहित शेती करताना येणाऱ्या अडचणी, बदलत्या हवामानाचा पिकावर होणारा परिणाम अशा कित्येक गोष्टी या पुस्तकात सविस्तरपणे सांगितल्या आहेत. तसेच ग्रामीण सांस्कृतिक जीवन, खेडय़ातील स्वयंपूर्ण अर्थव्यवस्था याबद्दलचं अनुभवपर भाष्य या पुस्तकात केलेलं आहे.

‘कॉर्पोरेटला रामराम, शेतील सलाम’

लेखक – वेंकट अय्यर

अनुवाद – दीपक कुळकर्णी

मेहता पब्लिशिंग हाऊस,

पृष्ठे – १९८, किंमत- २९५ रुपये