08 August 2020

News Flash

कोण चुकीच्या मार्गाने गेले हे देशच ठरवेल – मनेका गांधी

कोण चुकीच्या मार्गाने गेले हे देशच ठरवेल, त्याची उठाठेव दुसऱ्यांनी करायची गरज नाही, अशा शब्दात भाजपच्या नेत्या मनेका गांधी यांनी त्यांचे पुत्र वरुण गांधी यांच्याबाबत

| April 14, 2014 12:57 pm

कोण चुकीच्या मार्गाने गेले हे देशच ठरवेल, त्याची उठाठेव दुसऱ्यांनी करायची गरज नाही, अशा शब्दात भाजपच्या नेत्या मनेका गांधी यांनी त्यांचे पुत्र वरुण गांधी यांच्याबाबत प्रियांका गांधी यांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली.  
प्रियांका गांधी यांनी अमेठी येथे सांगितले की, शेजारच्या सुलतानपूर मतदारसंघात भाजपला मते देऊ नका, तेथे माझा चुलत भाऊ वरुण गांधी उभा आहे तो माझ्या कुटुंबातला आहे पण तो भरकटलेल्या मार्गाने चालला आहे. जर कुटुंबातील तरुण मुलगा चुकीचा मार्ग निवडत असेल तर घरातील थोरामोठय़ांनी त्याला योग्य मार्ग दाखवला पाहिजे तुम्ही सर्वानी माझ्या भावाला खरा मार्ग दाखवा असे आवाहन मी तुम्हाला करीत आहे.
यावर वरुणच्या आई मनेका गांधी यांनी सांगितले की, जर वरुण देशाची सेवा करताना भरकटला असेल तर देश काय ते ठरवील तुम्ही त्याची काळजी करण्याची गरज नाही. अमेठी येथे राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरला त्यावेळी सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी उपस्थित होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 12:57 pm

Web Title: maneka backs son varun gandhi
Next Stories
1 राबडींची मालमत्ता दोन वर्षांत दुप्पट
2 निवडणूक आयोगही सरकारी ‘गुलाम’!
3 सोनियांचे आंधळे पुत्रप्रेम घातक – मोदी
Just Now!
X