निवडणुकीत ‘काही खरे नाही’ या चिंतेने अस्वस्थ झालेल्या राज्यकर्त्यांना उशिरा का होईना रामराज्याची आठवण झाली आहे. त्यानुसार लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यासाठी ‘सुप्रशासनाचा’ आराखडा पंधरा दिवसात सादर करण्याचे आदेश सर्व विभाग सचिवांना देण्यात आले
आहेत. मुख्य सचिवांनी दोनच दिवसांपूर्वी सचिवांची बैठक घेऊन सरकारची नाराजी पोहोचवितानाच कामाला लागण्याचे आदेश दिले. प्रत्येक सचिवांनी आपल्या विभागाचा आराखडा तयार करावा, लोकांचे महत्वाचे काय प्रश्न असतात, ते सोडविण्यासाठी कोणत्या उपयाय योजनांची गरज असून त्या अंमलात कशा आणता येथील याच्या सूचना देण्यात आल्या असून महिनाभरात या आराखडय़ाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.