भारतीय जनता पक्षाचे(भाजप) पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे चांगले वक्ते नसल्याचे मत उमा भारतीय यांनी केले होते. याच मताचा त्यांनी आज(मंगळवार) पुनरुच्चार केला. मोदी उत्तम वक्ते नसल्याच्या मतावर ठाम असल्याचे त्या म्हणाल्या.
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा भारती यांनी नरेंद्र मोदींची तुलना अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी केली होती. त्या म्हणाल्या की, “अटलबिहारी वाजपेयी उत्तम वक्ते होते. देशाच्या राजकारणात वाजपेयींसारखा उत्तम वक्त होणे नाही असे अनेकांचे मत आहे. आपण नीट लक्षपूर्वक ऐकले, तर कळू शकेल की मोदी हे उत्तम वक्ते नाहीत. तसेच देशातील जनता मोदींच्या भाषणासाठी प्रचारसभांना गर्दी करत नाही, तर ‘मोदींनी देश बदलावा आणि यासाठी आम्ही तुमच्यासोबत आहोत’ हे सांगण्याच्या इच्छेने गर्दी जमा होते.”
मोदी उत्तम वक्ते नसल्याच्या वक्तव्यावर ठाम असल्याचे उमा भारती यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. उमा भारती आज म्हणाल्या की, “पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळलेले अटलबिहारी वाजपेयी हे भाजपचे एकमेव नेते आहेत. वाजपेयी उत्तम नेतृत्वाचे प्रतिक मानले जाते. वाजपेयी मोदींपेक्षा सर्व बाबतीत ज्येष्ठ आहेत. मोदीही आपल्या भाषणांतून वाजपेयींच्या कार्याचा उल्लेख करतात. मोदींची वकृत्वकला ही वाजपेयींपेक्षा भरपूर वेगळी आहे”. असेही त्या म्हणाल्या.