हरयाणातील भूपिंदरसिंग हुडा मंत्रिमंडळाचा राजीनामा देऊन त्यानंतर तो मागे घेणारे मंत्री अजय यादव यांना विधानसभा निवडणुकीच्या प्रचार समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे, तर नवीन जिंदाल यांच्याकडे प्रसिद्धी समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहेत.
प्रचार समितीमध्ये ज्येष्ठ नेते किरण चौधरी यांची सहनिमंत्रक म्हणून तर दिलू राम बाजीगर यांची निमंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिंदाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीचे निमंत्रक म्हणून अजय शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार दीपेंद्रसिंग हुडा यांच्यासह अन्य सात सदस्यांचाही समितीमध्ये समावेश आहे.
हरयाणा प्रदेश प्रचार समिती आणि प्रसिद्धी आणि प्रकाशन समितीला काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मान्यता दिल्याचे अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी सांगितले.