आयुष्यात आपण कधीच बनावट मतदान करवून घेतले नाही. सध्या राष्ट्रवादीत असलेली ‘अर्धी गँग’ जिल्हा बँक प्रकरणात फरारी आहे. पूर्वी हेच माझ्याबरोबर होते, भविष्यात ते पवारांबरोबर राहतील, याची शाश्वती नाही. फरारी आमदार आमदार अमरसिंह पंडित यांच्या तालुक्यात येऊन पवार सभा घेतात. बँकेतील मारामारी प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या सुरेश धस यांना उमेदवारी दिली. अशा फरारी व बनावट गँगपासून पवारांनीच सावध राहणे गरजेचे आहे, असा सल्ला भाजपनेते गोपीनाथ मुंडे यांनी पवारांना दिला. महायुतीच्या कार्यालयात आयोजित बठकीत बोलताना ‘पवारांनी महिनाभर बीडमध्ये मुक्काम ठोकला, तरीही जास्त मतांनी निवडून येऊ,’ असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.