राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत कौर-राणा यांना राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांचा जाहीर विरोध असतानाच आता स्थानिक काँग्रेस नेत्यांनीही त्यांची कोंडी करण्यास सुरुवात केली असून जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाजप-शिवसेनेसोबत असलेल्या आघाडीवरून वातावरण बिघडले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेतील सेना-भाजपसोबतची आघाडी न तोडल्यास राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिल्याने राणा दाम्पत्याची डोकेदुखी वाढली आहे. बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत कौर यांना सर्व गटातटांना एकत्रित आणणे कठीण होऊन बसले आहे. शनिवारी राष्ट्रवादीच्या संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनातील मेळाव्यात काँग्रेसचा एकही पदाधिकारी सहभागी झाला नव्हता.
संग्रहित लेख, दिनांक 10th Mar 2014 रोजी प्रकाशित
नवनीत राणा यांची काँग्रेसकडूनही कोंडी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत कौर-राणा यांना राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांचा जाहीर विरोध असतानाच आता स्थानिक काँग्रेस नेत्यांनीही त्यांची कोंडी

First published on: 10-03-2014 at 03:03 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress traps navneet rana in amravati