आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत लोकभावना दुखावणारी वक्तव्ये करणे राजकीय पक्षांनी टाळावे, असे आवाहन केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे करण्यात आले आहे. अनेकदा प्रचारादरम्यान, राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये केली जातात आणि अशी वक्तव्ये केल्यानंतर मग निवडणूक आयोगाला त्यात हस्तक्षेप करावा लागतो. मात्र यंदा हे टाळण्याचा प्रयत्न आयोगाने केला आहे. अग्रसक्रिय राहत, अशी लोकभावना दुखावणारी आणि व्यक्तिगत स्वरूपातील टीका करणारी वक्तव्ये टाळा, असे आवाहन निवडणूक आयुक्त ब्रह्मा यांनी केले. मतदान अधिक व्हावे यासाठी जास्त टप्प्यांत ते घेतले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 6th Mar 2014 रोजी प्रकाशित
‘लोकभावना दुखावणारी वक्तव्ये करू नका’
आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत लोकभावना दुखावणारी वक्तव्ये करणे राजकीय पक्षांनी टाळावे, असे आवाहन केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे करण्यात आले आहे.

First published on: 06-03-2014 at 05:05 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont touch to public sentiments election commission