निवडणूक आयोगाच्या आदेशांनंतरही निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या केंद्रीय महिला आणि बालकल्याणमंत्री क्रिश्ना तिरथ यांचे छायाचित्र मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून हटविण्यात आलेले नाही. कोणत्याही मंत्र्यांची छायाचित्रे अधिकृत शासकीस संकेतस्थळांवर ठेवू नयेत,असे आचारसंहितेत स्पष्ट करण्यात आले आहे. तसे स्पष्ट निर्देश अतिरिक्त सचिवांच्या माध्यमातून सर्व संबंधित सचिवांना देण्यात आले होत़े त्यांचे कठोर पालन करण्याचेही आयोगाने बजावले होत़े तरीही तिरथ यांचे छायाचित्र तसेच राज्यमंत्री के. व्ही़ थॉमस यांचे माहितीपत्र संकेतस्थळावर आह़े या संदर्भात अधिक चौकशी करून निर्णय घेण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd May 2014 रोजी प्रकाशित
आयोगाचा आदेश सरकारकडूनच धाब्यावर
निवडणूक आयोगाच्या आदेशांनंतरही निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या केंद्रीय महिला आणि बालकल्याणमंत्री क्रिश्ना तिरथ यांचे छायाचित्र मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरून हटविण्यात आलेले

First published on: 03-05-2014 at 04:03 IST
TOPICSनिवडणूक आयोगElection Commissionलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Electionलोकसभा पोल २०२४Lok Sabha PollsसरकारGovernment
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Government election commission