जनता दल-राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या आघाडीने भाजप धास्तावले आहे. त्यामुळेच भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आघाडीवर टीका केली, असे मत बिहारचे मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी व्यक्त केले. बिहारमधील आमची आघाडी राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधात व्यापक आघाडीसाठी दिशादर्शक ठरेल, असे भाकीत त्यांनी वर्तवले. देशाला असलेला धोका पाहता धर्मनिरपेक्ष पक्षांनी पुढे यावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच तिन्ही पक्षांना एकत्रित प्रचार करण्यात कोणतीही अडचण नाही, असा दावाही केला.