सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात येवला मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती महात्मा फुले यांच्या वंशज पणतू सून नीता रमाकांत होले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. भाजपकडे उमेदवारी मागितली असून पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी लढण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे विद्यापीठाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव मिळावे, या मागणीसाठी सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेच्या माध्यमातून केलेल्या संसदीय संघर्षांची गाथा सांगणाऱ्या ‘त्रिवार वंदन ज्ञानज्योतीला’ या पुस्तक प्रकाशनासाठी आज नीता होले व विशाल होले येथे आले होते. त्यांनी राज्यातील आघाडी सरकार व  बांधकाममंत्री छगन भुजबळ यां्च्यावर टीका केली.