एकनाथ शिंदेंची मत्तेदारी जनता आता सहन करणार नाही असे म्हणत कल्याण लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकसभा उमेदवार राजू पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. अंबरनाथ येथील प्रचारसभेत राजू पाटील यांनी आपल्या भाषणात स्थानिक समस्यांवर भर देऊन विरोधकांनवर टीका केली. स्थानिक छोट्या समस्या सोडविणे जरी खासदाराचे काम नसले तरी लहान-लहान समस्या देखील खासदाराने सोडवाव्यात अशी जनतेची अपेक्षा असते त्यामुळे खासदार झाल्यानंतर जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी संकेतस्थळ सुरू करणार असल्याचेही जाहीर केले. तसेच कल्याण मतदार संघात काम करताना पहिल्यांदा वाहतूकीच्या समस्या सोडविण्यावर भर राहणार असल्याचेही राजू पाटील म्हणाले. स्थानिकांच्या प्रश्नांना राजू पाटील यांनी सविस्तरपणे उत्तरे दिली. सभेत राज ठाकरेंच्या हस्ते ११ मुद्यांचा जाहीरनामाही राजू पाटील प्रसिद्ध केला. स्थानिकांच्या प्रश्नांवर राजू पाटील यांनी दिलेली उत्तरे आणि सभेतील भाषण-
संग्रहित लेख, दिनांक 17th Apr 2014 रोजी प्रकाशित
महाराष्ट्राचा ‘मनसे’ आवाज दिल्लीत घुमणारच- राजू पाटील
एकनाथ शिंदेंची मत्तेदारी जनता आता सहन करणार नाही असे म्हणत कल्याण लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकसभा उमेदवार राजू पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
First published on: 17-04-2014 at 03:33 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns candidate raju patil interview