लोकसभा निवडणुकीसाठी जास्तीत जास्त नवीन आणि सार्वजनिक जीवनात विशिष्ठ स्थान असलेले उमेदवार देण्यावर राज ठाकरे यांचा भर असल्यामुळेच मनसेची नावे जाहीर होण्यास उशीर होत असल्याचे एका ज्येष्ठ आमदाराने सांगितले.
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडण्याकरता राज ठाकरे यांनी जिल्हावार आढावा घेतला .या बैठकीत राज यांनी किती जागा लढविण्यात येतील तसेच उमेदवार कोण असतील यावर  तसेच उमेदवार कोण असतील यावर काहीही मतप्रदर्शन केले नाही. उत्तर मुंबईमधून आमदार प्रवीण दरेकर यांना तर इशान्य आणि दक्षिण मुंबईतून आमदार राम कदम आणि बळा नांदगावकर यांना निवडणूक लढविण्यास सांगितले जाईल, असे चित्र आहे. लोकसभेच्या सोळा ते अठरा जागा मनसे लढविण्याची शक्यता असून यात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल असे राज यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे.