पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सन्मानार्थ काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आयोजित केलेल्या मेजवानीस दांडी मारल्याने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर सर्व बाजूंनी टीका होत आहे. राहुल यांनी मनमोहन यांच्यासारख्या बुजुर्ग नेत्याचा अवमान केल्याची जळजळीत प्रतिक्रिया विरोधी पक्षांनी व्यक्त केली आहे, तर पंतप्रधानांना सांगूनच राहुल ‘श्रमपरिहारार्थ’ परदेशात गेल्याचा बचाव काँग्रेसकडून केला जात आहे. पक्षाध्यक्षपदाची सूत्रे हाती येताच मावळते अध्यक्ष सीताराम केसरी यांचा सोनिया यांनी असाच अवमान केला होता आणि आता चिरंजीवही त्याच मार्गाने जात आहेत, अशा शब्दांत भाजप नेते तरुण विजय यांनी टीका केली.
संग्रहित लेख, दिनांक 16th May 2014 रोजी प्रकाशित
राहुल यांच्याकडून पंतप्रधानांचा अवमानच!
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सन्मानार्थ काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आयोजित केलेल्या मेजवानीस दांडी मारल्याने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर सर्व बाजूंनी टीका होत आहे.

First published on: 16-05-2014 at 03:52 IST
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi insulted pm manmohan singh