09 July 2020

News Flash

पाणी संवर्धनासाठी एकात्मिक विचार महत्त्वाचा

पाण्याच्या प्रवाहासमोर मोठाले वृक्षही टिकत नाहीत. कारण त्याच्या वजनाच्या तुलनेत त्याचा बांधा कमी असतो.

पाण्याच्या प्रवाहासमोर मोठाले वृक्षही टिकत नाहीत. कारण त्याच्या वजनाच्या तुलनेत त्याचा बांधा कमी असतो. झाडात लवचीकता नसते, मुळे म्हणावी तितकी खोल नसतात. त्यातून झाडे उन्मळून पडतात. त्याउलट लव्हाळ्यामध्ये लवचीकता असते. त्याची मुळे खोल असतात. पाणी जेव्हा एकत्र येते तेव्हा ते कोणालाही जुमानत नाही. गंगा नदीचा प्रवाह, नर्मदेची माती वाहून नेण्याची क्षमता याची आपण कल्पनाही करू शकत नाही. या नद्यांचा पात्रबदल हा ५० किलोमीटरच्या आसपास असतो. त्यामुळे पाण्याची साठवण करत असताना जमिनीचा उतार व भूस्तरीय वस्तुस्थिती, जमिनीची पातळी यांच्या अध्ययनाशिवाय सरळसोट नदीचे खोलीकरण हे वरदान ठरण्याऐवजी शाप ठरू शकतो.

पाणी संकलन आणि संवर्धन या विषयाचा विचार करताना यात गुंतलेल्या भूव्यवस्थापन, भूस्तरीय अध्ययन, वनस्पती संबंध व कृषीविषयक दृष्टिकोन या सर्व बाबींचा समग्र विचार करण्याची गरज आहे.

पाण्याची वैज्ञानिक गुणवत्ता म्हणजे ऌ2ड हायड्रोजन व ऑक्सिजनच्या संयोगातून पाण्याचा एक सूक्ष्म कण निर्माण होतो. हा सूक्ष्म कण संकलित केल्यानंतर त्याचा साठा बनतो. साठवलेला पाण्याचा साठा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या दबावामुळे पृथ्वीच्या मध्याकडे जाण्याचा प्रकर्ष (तीव्रता) वाढतो. साठवलेले पाणी उताराच्या दिशेने जाते. उतार हा गुरुत्वाकर्षण िबदूच्या जवळ असल्यामुळे पाणी त्या दिशेने जाते. संघटित पाण्याची शक्ती प्रचंड असते त्यामुळेच अशा पाण्याच्या प्रवाहापासून मोठाले वृक्ष, दगड स्वतला वाचवू शकत नाहीत. ‘महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती’ असे संत तुकारामांनी सांगून ठेवले आहे.

पाण्याच्या प्रवाहासमोर मोठाले वृक्षही टिकत नाहीत. कारण त्याच्या वजनाच्या तुलनेत त्याचा बांधा कमी असतो. झाडात लवचीकता नसते, मुळे म्हणावी तितकी खोल नसतात. त्यातून झाडे उन्मळून पडतात. त्याउलट लव्हाळेमध्ये लवचीकता असते. त्याची मुळे खोल असतात. पाणी जेव्हा एकत्र येते तेव्हा ते कोणालाही जुमानत नाही. गंगा नदीचा प्रवाह, नर्मदेची माती वाहून नेण्याची क्षमता याची आपण कल्पनाही करू शकत नाही. या नद्यांचा पात्रबदल हा ५० किलोमीटरच्या आसपास असतो. त्यामुळे पाण्याची साठवण करत असताना जमिनीचा उतार व भूस्तरीय वस्तुस्थिती, जमिनीची पातळी यांच्या अध्ययनाशिवाय सरळसोट नदीचे खोलीकरण हे वरदान ठरण्याऐवजी शाप ठरू शकतो.

महाराष्ट्रातील भूस्तरीय अध्ययन झाले आहे. त्याचे सर्व प्रकारचे नकाशे तयार आहेत, मात्र ही माहिती अकारण गुप्त ठेवण्यात आली आहे. वास्तविक ही माहिती खुली करण्याची अतिशय गरज आहे. जेवढा पाण्याचा साठा अधिक करण्याचे नियोजन आपण करू तेवढे त्यासाठी जास्त पसे खर्च करावे लागतात. कारण साठलेले पाणी रोखून धरण्याची क्षमता अधिकची निर्माण करण्यासाठी आíथक गुंवतणूक वाढते. त्यामुळे छोटय़ा स्तरावर पाण्याचा साठा करण्याचे प्रयोग हाती घेतले गेले पाहिजेत. भूस्तरीय अध्ययनात जलस्रोताची क्षमता, जलधारण क्षमता यांचा अभ्यास होण्याची गरज आहे.

वनस्पतीशास्त्राचाही व्यवहार्य अभ्यास करण्याची गरज आहे. वनस्पतीची सोटमुळे जमिनीत खोलवर जातात हे प्रयोगशाळेत सिद्ध करणे सोपे आहे. वस्तुस्थिती मात्र विपरीत आहे. आपल्याकडे कांचन नावाचा वृक्ष पाषाणात येतो व त्याची मुळे पाषाण फोडतात असे सांगितले जाते, मात्र हे वस्तुस्थितीवर आधारित नाही. वनस्पतीची मुळे ही शक्य तेवढी जमिनीत खोलवर जातात, मात्र त्यानंतर ती स्वतची जाडी वाढवतात व मुख्य मुळाचे काम पाणी साठवून ठेवण्याचे बनते व त्याला उपमुळे सुटतात. त्या पाणी शोषून घेण्याचे काम करतात. आपल्या डोळय़ांना ज्या जमिनीवर पाणी दिसत नाही अशा जमिनीतील पाणी साठवून ठेवण्याची क्षमता झाडांची मुळे करतात. ती जमिनीत खोल गेल्यानंतर जमीन भुसभुशीत करतात. ज्यामुळे जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता वाढते. जमीन व वनस्पती यांचे परस्पर नाते आहे. त्यांच्यासह जीवनातून जलसंवर्धन वाढीस लागते. पाणी, जमीन व वनस्पती यांचे परस्पर नाते लक्षात घेऊन कृषीविषयक दृष्टिकोन विकसित करण्याची गरज आहे.

पूर्वीच्या काळी लोकसंख्या व निसर्गातील सर्व घटक लक्षात घेऊन शेती केली जायची. जमिनीच्या आकाराच्या किमान १० टक्के शेतावर बांध होते. त्या बांधावरील उगवणाऱ्या वनस्पतीवर निसर्गातील किडे, मुंग्या, फुलपाखरे यांचे पालनपोषण होत होते. अधिकाधिक जमिनीचा वापर करण्याच्या उद्देशाने शेतातील बांधाची रुंदी कमी होत गेली अन् त्यातूनच अनेक प्रश्न निर्माण झाले. पाणी प्रश्न तयार होण्याची सुरुवात बांधामुळे झाली. शेतात असणारी झाडे हे जमिनीत विविध प्रकारची खनिज द्रव्ये निर्माण करण्याचे काम करत असत. बदलत्या काळात शेतातून झाडांची संख्या कमी झाली. बांध कमी झाले. अधिक उत्पादन घेण्याच्या नादात रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर वाढला. त्यातून जमिनीची उपजाव क्षमता कमी होऊ लागली. आपण विचार करताना समस्यांच्या मुळाशी जायला हवे. तात्पुरत्या मलमपट्टीतून मिळणारे लाभही तात्पुरतेच असतात. गावे स्वयंपूर्ण होण्यासाठी गावच्या समस्या नेमक्या काय आहेत? पीकपद्धती नेमकी कोणती आहे? त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवे याचा साकल्याने विचार व्हायला हवा. सेंद्रीय शेतीतून अनेक समस्यांची उत्तरे मिळतात हा आपला अभ्यासांती अनुभव असल्याचे मत उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अंबादास जोशी यांनी व्यक्त केले. या विषयावर समग्र चर्चा व्हावी व त्यातून उत्तरे शोधण्याची सवय निर्माण व्हावी ही अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

pradeepnanandkar@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 1:35 am

Web Title: water conservation issue water issue
Next Stories
1 फळप्रक्रिया उद्योगाकडून सेंद्रिय शेतीकडे
2 मनुष्यबळविरहित भातशेतीच्या दिशेने..
3 सेंद्रिय शेतीचा आगळा प्रयोग
Just Now!
X