News Flash

प्राणवायूअभावी दीड तासात गोंदियात १५ जणांचा मृत्यू

प्राणवायूअभावी अवघ्या दीड तासात १५ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री गोंदियातील वैद्यकीय महाविद्यालयात घडली.

(संग्रहित छायाचित्र)

प्राणवायूअभावी अवघ्या दीड तासात १५ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री गोंदियातील वैद्यकीय महाविद्यालयात घडली.

महाविद्यालयातील वॉर्ड क्रमांक १,२, ३ व ४  येथील प्राणवायूचा साठा संपल्याने व अतिरिक्त सिलिंडर उपलब्ध नसल्याने १५ अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात प्राणवायूचा साठा संपल्याचे स्पष्ट होताच महाविद्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्राणवायूचा पुरवठा सुरळीत नसल्याची बाब आरोग्य कर्मचारी आपल्या वरिष्ठांना वेळोवेळी कळवत होते. पण वरिष्ठांनी  वेळीच लक्ष दिले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबतची चर्चा समाजमाध्यमांवर सुरू झाल्यानंतर आमदार डॉ. परिणय फुके यांनी भंडारा सनफ्लॅग स्टील कंपनी येथून १०० सिलिंडरची गाडी रात्री ३ वाजता गोंदिया महाविद्यालयात पाठवली. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने आणखी १८० सिलिंडरची व्यवस्था झाल्यानंतर प्राणवायू व्यवस्था सुरळीत झाली.

प्राणवायू पुरवठा करणारे श्याम मित्तल यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, मी उत्पादक नाही तर पुरवठादार आहे. नेहमी १०० ते १५० सिलिंडर लागणाऱ्या गोंदियात सध्या ६०० सिलिंडरची मागणी होत आहे. माझे देयक थकीत असले तरी पुरवठा सुरूच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2021 12:36 am

Web Title: 15 die in gondia due to lack of oxygen abn 97
Next Stories
1 राजाराम महाराजांचे भोजपत्रावरील साहित्य दुर्लक्षित
2 रेमडेसिविरचा तुटवडा कायम
3 करोनाबाधित गर्भवतींसाठी जूचंद्र येथे उपचार केंद्र
Just Now!
X