औषधे तयार करण्यासाठी आवश्यक असणारा सक्रीय औषधी घटक (एपीआय) व औषधनिर्मिती क्षेत्रात देशातील अग्रगण्य उत्पादक तसेच इतर रासायनिक उत्पादने करणाऱ्या आरती समूहाने करोना विरुद्धच्या लढाईसाठी 17.6 कोटी रुपयांची मदत विविध स्तरांवर केली आहे.

महाराष्ट्र व गुजरातमध्ये या समूहाचे 20 पेक्षा अधिक कारखाने असून त्यांनी आठ हजार पेक्षा अधिक नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार दिला आहे.  आरती समूहाने पंतप्रधान मदतनिधीसाठी दहा कोटी रुपये, राज्याच्या मुख्यमंत्री मदतनिधीसाठी पाच कोटी रुपये, गुजरात राज्याच्या मुख्यमंत्री मदत निधीसाठी अडीच कोटी रुपये तसेच मध्य प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री मदतनिधीसाठी दहा लक्ष रुपयांची मदत केली आहे. याखेरीज या समूहाच्या सर्व संचालकांनी आपले तीन महिन्यांचे वेतन करोना विरुद्धच्या लढाईसाठी देण्याची घोषणा  देखील केली आहे.

आरती औषधी समूहाने गेल्या काही वर्षात पालघर तालुक्यातील दीडशे एकर क्षेत्रावर 68 हजार झाडे लावून व त्यांचे रक्षण करून सामाजिक वनीकरणाचा उपक्रम राबवला आहे.