27 September 2020

News Flash

बीडमध्ये महाप्रसादातून ५०० भाविकांना विषबाधा

बीड जिल्ह्यातील गाडे पिंपळगावात महाप्रसादातून ५०० हून अधिक भाविकांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.

| August 27, 2015 12:57 pm

बीड जिल्ह्यातील गाडे पिंपळगावात महाप्रसादातून ५०० हून अधिक भाविकांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. श्रावणी एकादशी असल्याने गाडे पिंपळगावात एका धार्मिक कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांना साबूदाणा खिचडी महाप्रसाद म्हणून वाटण्यात आली होती. ही खिचडी खाल्ल्यानंतर अनेकांना उलट्या, अतिसार आणि चक्कर येणे, असे त्रास होण्यास सुरूवात झाली. एकाचवेळी अनेकांना हा त्रास झाल्याने  परिसरात गोंधळ उडाला आणि विषबाधा झाल्याची शंका येथील अनेकांच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे त्रास झालेल्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. विषबाधा झालेल्यांवर परळी आणि सिरसाळा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2015 12:57 pm

Web Title: 500 peoples hospitalised for food poisoning
Next Stories
1 गागोद्याला ‘पीपली लाइव्ह’चे स्वरूप !
2 भांड यांना निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र दिलेच नव्हते!
3 जैन समाजाचा कोल्हापुरात मोर्चा
Just Now!
X