उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी  पगारवाढीची घोषणा केल्यानंतर राज्यातील वीज कर्मचाऱ्यांचे चेहरे आनंदाने उजळले. राज्य सरकारच्या या निर्णयानुसार, वीज कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनात २५ टक्क्यांनी वाढ होणार असल्याचे समजते. राज्यातील महावितरण, महाजनेको आणि महाट्रान्सकोच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा मिळणार आहे. तसेच ही पगारवाढ १ एप्रिल २०१३ पासून लागु करण्यात येणार असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आनंदात दुहेरी भर पडली आहे. राज्याच्या  वीज क्षेत्रातील तब्बल ९६ हजार कर्मचाऱ्यांना सरकारच्या वेतनवाढीच्या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.