News Flash

आनंदराव देवकते राष्ट्रवादीत; सोलापुरात काँग्रेसला धक्का

काँग्रेसचे स्थानिक ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आनंदराव देवकते यांनी पक्षाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात देवकते यांचे भाचे तथा

| September 30, 2014 02:10 am

काँग्रेसचे स्थानिक ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आनंदराव देवकते यांनी पक्षाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात देवकते यांचे भाचे तथा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे देवकते यांनीही राष्ट्रवादीत जाणे पसंद  केले आहे. त्यामुळे काँग्रेसला धक्का बसला आहे.
दक्षिण सोलापूरमधून देवकते हे १९७८ सालापासून २५ वर्षे विधानसभेवर प्रतिनिधित्व केले होते. १९९२-९३ साली तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या विरोधात पक्षांतर्गत झालेल्या उठावात स्वत: शंकरराव चव्हाणनिष्ठ असूनदेखील देवकते यांनी आक्रमक भूमिका बजावली होती. १९९९ ते २००३ या कालावधीत त्यांनी दुग्धविकास व पशुसंवर्धन खात्याचे कॅबिनेट मंत्रिपदही सांभाळले होते. नंतर ‘महानंदा’चे अध्यक्षपदही भूषविले होते. २००३ साली सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री झाले. तेव्हा देवकते यांनी शिंदे यांच्यासाठी आमदारकी सोडली होती. नंतर सोलापूर लोकसभा पोटनिवडणुकीत देवकते यांना काँग्रेसने संधी दिली असता त्यांचा पराभव झाला होता. तेव्हापासून देवकते यांची राजकीय पिछेहाट होत गेली.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील पाण्याच्या प्रश्नावर शासनाने उदासीनता दाखवली असून पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आपण राष्ट्रवादीत गेल्याचे देवकते यांनी सांगितले. जिल्ह्य़ात आपण खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2014 2:10 am

Web Title: anandrao devkate in ncp
Next Stories
1 प्रीतम मुंडे ८८ कोटी, अशोक पाटील ४८ कोटी, क्षीरसागर ३४ कोटी, पंकजा २६ कोटी..
2 कोटींच्या उड्डाणात गुट्टे, मुंडे, दर्डा पुढे!
3 गुट्टे दाम्पत्य ‘अब्जाधीश’! वार्ताहर, परभणी
Just Now!
X