शेतकऱ्यांचा सखा असलेल्या बलांप्रती आदरभाव व्यक्त करणारा बेंदूर हा सण शहर आणि परिसरात पारंपरिक आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद देत काही हौशी शेतकऱ्यांनी बलांच्या अंगावर स्वच्छ भारत सुंदर भारत, बेटी बचाव अशा घोषणा लिहून सामाजिक संदेश दिला होता.  सायंकाळी गावभागातील जुनी गावचावडी येथे कर तोडण्याचा कार्यक्रम पार पडला. या परिसरात कर्नाटकी बेंदूर साजरा करण्याची प्रथा आहे.
प्रतिवर्षांप्रमाणे या परिसरात कर्नाटकी बेंदूर साजरा करण्यात आला. वटपौर्णिमा झाल्यानंतर कर्नाटकी बेंदूर हा सण येतो. सकाळपासून गाय-बैलांना न्हाऊ माखू घातले जात होते. त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घालून पुरणपोळीचा नवेद्य खायला दिला गेला. जातो. याशिवाय घरात मातीचे दोन बल आणून त्यांची हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगांवर ठेवून त्यांची मनोभावे पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नवेद्य दाखवला. बलांना सजवण्यासाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी बाजारपेठेत मांडण्यात आलेल्या स्टॉलवर बळीराजाने गर्दी केली होती.
सकाळपासून पंचगंगा नदीघाटावर आपल्या बलांना अंघोळ घालून त्यांना विविध आकर्षक रंगांनी व फुलांनी सजवून त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येत होती. शहरात अनेक ठिकाणी कर तोडण्याचा कार्यक्रमही पार पडला. सायंकाळी प्रथेनुसार गावभागातील महादेव मंदिर नजीक पारंपरिक पद्धतीने कर तोडण्याचा कार्यक्रम पार पडला.
कर्नाटकी बेंदूर सणानिमित्त शहर व परिसरात बलांसह जनावरांचे पूजन शेतकरी कुटुंबीयांनी केले. मिरवणुकीने घरी आल्यावर बलांची ओवाळणी करून बलांना पुरणपोळीचा नवेद्य चारण्यात आला. इचलकरंजीतील कागवाडे मळय़ातील जिम्नॅशियम मदानात भरवलेल्या जनावरांच्या प्रदर्शनात विविध प्रकारची सुमारे १०० जनावरे सहभागी झाली होती. उत्कृष्ट असलेल्या जनावरांना वेगवेगळय़ा प्रकारची अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.