केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार… प्रीतम मुंडे यांच्याऐवजी डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय मंत्रिमंडळात लागलेली वर्णी आणि त्यानंतर पंकजा मुंडे समर्थकांची समोर आलेली नाराजी. या सर्व राजकीय नाट्यावर भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी पडदा टाकला. दिल्लीतून परतलेल्या पंकजा मुंडे यांनी मुंबईत भेटीसाठी आलेल्या समर्थकांशी संवाद साधला. त्यांनी दिलेले राजीनामे नामंजूर करत पंकजा यांनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली. यावेळी बोलताना त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह, जे.पी. नड्डा हे आपले नेते असल्याचं सांगितलं. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख न केल्यानं अनेकांच्या मनात शंका उपस्थित झाली. पत्रकारांनीही ही शंका उपस्थित करत पंकजा यांना सवाल केला. यावर त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना उत्तर दिलं.

राजीनामे दिल्यानंतर मुंबईत आलेल्या समर्थकांची पंकजा मुंडे यांनी भेट घेतली. त्यानंतर भाषणंही केलं. भाषणानंतर पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांच्या राजीनाम्यावर त्या म्हणाल्या,”भाजपा नेत्यांनीही यावर भाष्य केलं आहे. आम्ही नाराज नसल्याचं आशिष शेलार, राम शिंदे, प्रविण दरेकर आणि देवेंद्र फडणवीसही बोलले आहेत. आता आणखी कुणी बोलण्याची आवश्यकता नाही. कार्यकर्त्यांनी दिलेले राजीनामे मंजूर नाहीत, ते मागे घेण्यात यावेत, असंही मी सांगितलं आहे. याचं कारण म्हणजे ते आपापल्या स्तरावर स्वतःच्या पायावर राजकारणात उभे आहेत. त्यांचे राजीनामे देऊन, दबावतंत्र करण्याची मला गरज नाही. माझ्या नेत्यांशी माझा व्यवस्थित संवाद आहे,” असं पंकजा म्हणाल्या.

Narayan rane with Devendra Fadnavis
नारायण राणे यांचं वक्तव्य, “देवेंद्र फडणवीस मागे लागले म्हणून भाजपात गेलो, रस्त्यावरच त्यांनी…”
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
Jayant Patil On Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ विधानाला जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, “बारामतीकर त्याच पद्धतीने…”
Shiv Sena Thackeray group leader Anil Parab
“रामदास कदमांनी मंत्रिपदाचा दुरुपयोग करत जमीन घोटाळा केला…”; अनिल परब यांचा आरोप, म्हणाले, “किरीट सोमय्यांकडे…”

संबंधित वृत्त- मोदी, शाह, नड्डा माझे नेते… धर्मयुद्ध टळावं, कारण माझे सैनिक आडवे पडताहेत; पंकजा मुंडे कडाडल्या

धर्मयुद्ध म्हणजे नेमकं काय?

कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंकजा मुंडे यांनी धर्मयुद्ध टाळायचं आहे, असं म्हटलं होतं. या धर्मयुद्ध शब्दाबद्दल त्यांनी भाष्य केलं. “मला डावलल्या जात आहे, अशी लोकांच्या मनात भावना आहे आणि ती तीव्र होत चालली आहे. डावलूनही मी काही करत नाही, असं लोकांना वाटतं. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक आहेत. मूळात गोपीनाथ मुंडे यांचा कार्यकर्ता आक्रमक आहे. आम्ही खूप संघर्ष केला. आम्हाला खूप संघर्षातून जावं लागलं. धर्मयुद्ध हे आहे की, माझ्यात आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना आहे. विधान परिषदेला फॉर्म भरायला लावला आणि रमेश कराडांना तिकीट दिलं. राज्यसभेसाठीही माझी चर्चा असताना भागवत कराडांना संधी दिली. पण, तिथंही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मी गेले होते. मग आता मंत्रिमंडळात डावललं असं लोकांना वाटतं आहे. यामुळे कराड आणि इतर नेत्यांशी संबंध खराब होऊन नये म्हणून आम्हाला लढावं लागणार आहे. जेव्हा एखादी व्यक्ती राज्यभर प्रवास करून संघटन करतो. मग त्यानंतर नेत्याला संघटनेत स्थान नसल्याची भावना कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण होतेय,” असं पंकजा यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा- आता इथे राम नाही, असं ज्यादिवशी वाटेल त्यादिवशी बघू; पंकजा मुंडेंनी दिले कठोर निर्णयाचे संकेत

माझे नेते राष्ट्रीय स्तरावरच…

माझ्याविषयी मागील दोन तीन दिवसात जी विधान केली गेली ती मी लिहून ठेवली आहेत. त्यामध्ये भाजपातील कोणत्याही नेत्याने नकारात्मक भाष्य केलेलं नाही. पण काही नेत्यांनी असं विधानं केली की पक्षाने काय दिलं, हे पंकजा मुंडेंनी लक्षात ठेवावं आणि ते विधान त्या नेत्यांकडून वारंवार केलं गेलं. माझ इतकंच म्हणणं आहे की पक्षाने मला जे दिलंय ते मी लक्षात ठेवेन, पण मलाच दिलं नाही. अनेकांना दिलंय. मग सतत का बोलून दाखवलं जातं”, असं पंकजा म्हणाल्या. त्यावर आपण मोदी, शाह, नड्डा यांचं नाव घेतलं, मग देवेंद्र फडणवीसांचं का नाही घेतलं? असा प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला. त्यावर पंकजांनी उत्तर दिलं. “मी राष्ट्रीय स्तरावर काम करते आहे. महाराष्ट्रात पक्षाच्या कोणत्याच पदावर नाही. माझे नेते राष्ट्रीय स्तरावरच आहेत”, असं म्हणत आपली भूमिका स्पष्ट केली.