03 March 2021

News Flash

हवामान बदललं, दोन दिवसात पावसाची शक्यता

दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण

(संग्रहित छायाचित्र)

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याचे संकेत आहेत. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांत पाऊस होण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी वातावरण ढगाळ राहू शकते. राज्यात सध्या कडाक्याच्या थंडीची लाट पसरली असतानाच हवामान बदलले आहे. राज्यातील काही ठिकाणी दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे आणि पुढील दोन दिवस हे वातावरण तसेच राहण्याची शक्यता आहे.

राज्याील काही भागांमध्ये १६ आणि १७ डिसेंबर रोजी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पूर्व-विदर्भात ढगाळी वातावरणाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. यामुळे अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहिल. याचबरोबर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांतील काही भागात या दरम्यान पावसाची शक्यता असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी वर्तविले आहे.

पूर्व-विदर्भातील शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे, असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. राहील. पूर्व-विदर्भातील शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे, असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2018 10:05 am

Web Title: climate change in the state possibility of rain in two days
Next Stories
1 बीडमध्ये कार झाडावर आदळली, तीन ठार
2 २०१९ मध्ये सुट्ट्यांची मज्जा कायम, पण सरकारी कर्मचाऱ्यांना फटका
3 जुंपली! रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं, नितेश राणेंचं प्रत्युत्तर
Just Now!
X