01 December 2020

News Flash

उस्मानाबादेत कापड व्यावसायिकाच्या कुटुंबासह नातेवाईक करोनाबाधित

जिल्ह्यात एकाच दिवसात सर्वाधिक 105 रुग्णाची नोंद

संग्रहित छायाचित्र

लॉकडाउनच्या चारही टप्प्यांमध्ये करोनाला रोखलेल्या उस्मानाबाद शहरात अनलॉकचे टप्पे सुरू झाल्यापासून करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. तर जिल्ह्यात एकाच दिवसात 105 बाधितांची नोंद झाली आहे. उस्मानाबाद शहरात एका कापड व्यावसायिकाच्या कुटुंबासह त्याच्या नातेवाईकांनाही करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. शहरात एकुण 24 रुग्ण एकाच दिवसात सापडले आहेत, तर तालुक्याची एकूण रुग्ण संख्या 38 झाली आहे.

उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयामार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथील कोविड चाचणी केंद्राकडे पाठविण्यात आलेल्या 387 स्वॅबचे अहवाल मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झाले आहेत. यात तब्बल 105 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. सर्वाधिक संख्या उमरगा तालुक्यात 47, उस्मानाबाद 38, वाशी 7, तुळजापूर 5, कळंब 5 तर परंडा तालुक्यात 3 रुग्ण आढळले आहेत.

आणखी वाचा- राज्यात २४ तासांत २३६ पोलीस करोना पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू

उस्मानाबादेत कापड व्यवसायिक कुटुंबातील ख्वाजानगरमध्ये तब्बल 14 तर महाराष्ट्र बँक परिसरातील 10 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर आगड गल्ली येथे आणखी 3 तर सांजारोड भागात 1 करोनाबाधित आढळून आला आहे. तालुक्यातील येवती येथे 3, येडशी, रुईभर, कौडगाव(बावी) येथेही प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे.

आणखी वाचा- करोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरवर प्राणघातक हल्ला

जिल्ह्यात 29 जुलैच्या दुपारपर्यंत एकुण करोनाबाधितांची संख्या 834 वर पोहचली असून, 482 जणांना उपचाराने बरे झाल्यानंतर घरी पाठविण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील 304 आणि बाहेरील जिल्ह्यातील परंतु उस्मानाबाद येथे उपचार घेत असलेले 4 अशा एकुण 308 जणांवर उचार सुरू असून 44 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

आणखी वाचा- ‘त्या’ मृत व करोनाबाधितांचा समावेश नेमका कुठे?

उमरगा तालुका ठरतोय हॉटस्पॉट

उमरगा तालुक्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या आता दोनशेपार गेली आहे. तालुक्यात आजवर तब्बल 215 जणांना करोनाची बाधा झाली आहे. यात शहरातील 164 तर ग्रामीण भागातील 51 जणांचा समावेश आहे. त्यापैकी 99 जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर उर्वरित रुग्ण बरे झाले आहेत. मंगळवारी एकाच दिवशी तालुक्यात तब्बल 47 नवे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यात पालिकेतील 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2020 3:28 pm

Web Title: corona to the family and relatives of a textile trader from osmanabad msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 राज्यात २४ तासांत २३६ पोलीस करोना पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू
2 वयापरत्वे हिंदू धर्मावरचा रागदेखील वाढतोय; निलेश राणेंची शरद पवारांवर टीका
3 करोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरवर प्राणघातक हल्ला
Just Now!
X