मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्याशी करोना निवरणाबाबत चर्चा केली असता त्यांनी ऑगस्ट पर्यंत लस संशोधन होइपर्यंत मुंबईतील संसर्ग आटोक्यात आणण्याची ग्वाही दिली आहे, असेही मुश्रीफ म्हणाले. राज्यात ४० हजार किमीचे रस्ते बांधणार असल्याची घोषणा त्यांनी केली. राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतीची मुदत संपलेल्या गावांमध्ये प्रशासक नेमणार असून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याचा अधिकार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.
उगाच बदनाम होऊ नका
१५ व्या वित्त आयोगातून ५ हजार ८०० कोटी निधी ग्राम विकास साठी मंजूर केला आहे. ५० टक्के निधी कोणत्याही विकास कामासाठी तर ५० टक्के निधी हागणदारी मुक्त, रेनवॉटर हार्वेस्टिंग यासाठी वापरायची आहे. हा निधी योग्य कामासाठी खर्च करा,उगाचच कंत्राटदाराच्या मागे लागून बदनाम होऊ नका,असा सल्ला त्यांनी ग्राम पंचायत समितीच्या सदस्यांना दिला.