राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण हळूहळू कमी होताना दिसत आहे. शिवाय करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही रोज मोठ्या संख्येने भर पडत आहे. आज दिवसभरात १० हजार ७६९ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. तर आजपर्यंत १५ लाख ८८ हजार ९१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.९६ टक्के झाले आहे.

आज राज्यात ३ हजार ७९१ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. तर, ४६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर २.६३ टक्के आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९५ लाख ३६ हजार १८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख २६ हजार ९२६ (१८.११टक्के) नमूने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १० लाख ११ हजार ४ व्यक्ती गृह विलगीकरणामध्ये आहेत. तर ६ हजार ९८० व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. तर, सध्या राज्यात एकूण ९२ हजार ४६१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.