करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्यानं केंद्र सरकारनं लॉकडाउनच्या कालावधीत वाढ केली. ३ मेपर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याबरोबरच देशातील करोनाचा उद्रेक झालेल्या ठिकाणी (हॉटस्पॉट) जास्त लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं बुधवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. देशात करोनाचे १७० हॉटस्पॉट असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या हॉटस्पॉटच्या यादीत महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यासह ११ जिल्ह्यांचा समावेश आहे.

देशात करोनाचा शिरकाव झाल्या मागील एका महिन्याच्या कालावधीत रुग्णांची संख्या प्रचंड वाढली. त्यामुळे केंद्र सरकारनं लॉकडाउनची घोषणा केली होती. लॉकडाउनच्या काळात ज्या ठिकाणी करोनाचा संसर्ग झालेले जास्त रुग्ण आढळून आले. अशा ठिकाणांना हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलं. देशातील करोनाचे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणांची यादी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं तयार केली आहे. त्याचप्रमाणे रुग्ण आढळून आलेले मात्र, हॉटस्पॉट नसलेल्या ठिकाणांचीही यादी करण्यात आली आहे. बुधवारी आरोग्य मंत्रालयानं देशातील हॉटस्पॉटविषयी माहिती दिली. देशात सध्या १७० हॉटस्पॉट असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे. केंद्र सरकारच्या यादीत महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

uddhav thackeray latest marathi news
“महाराष्ट्रद्वेष्टे सरकार घालवून द्या”, उद्धव ठाकरे यांचे आवाहन; म्हणाले, “एक नेता एक पक्ष असे…”
Central government confirms purchase of five lakh metric tonnes of onions from Maharashtra
निवडणुकीत कांदाखरेदीचा प्रचार? महाराष्ट्रातून पाच लाख मेट्रिक टन कांदाखरेदीची केंद्राची ग्वाही
Kendriya Vidyalaya
केंद्रीय विद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया सुरू, कधीपर्यंत भरता येणार अर्ज?
mpsc MPSC declared the result of Civil Engineering Pune
एमपीएससीकडून ‘स्थापत्य अभियांत्रिकी’चा निकाल जाहीर

देशात सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्णांची महाराष्ट्रात आहे. तर राज्यातील एकूण रुग्णांपैकी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण मुंबईत आहेत. करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही मुंबईत सर्वाधिक आहे. तर त्या पाठोपाठ पुण्याचा क्रमांक आहे. मात्र, मुंबई पुण्याबरोबरच केंद्र सरकारनं राज्यातील ११ जिल्ह्यांचा समावेश हॉटस्पॉटच्या यादीत केला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, सांगली, अहमदनगर, यवतमाळ, औरंगाबाद, बुलडाणा, मुंबई उपनगर आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश हॉटस्पॉटच्या यादीत करण्यात आलेला आहे.