राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ११ मार्च रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त ज्ञानाचा दिवा लावूयात असं आवाहन केलं आहे. शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,  “११ तारखेला महात्मा फुले यांची जयंती आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला ज्ञानाचा, एकतेचा संदेश दिला. त्यामुळे ज्ञानाचा दिवा लावून एक दिवा ज्ञानाचा या प्रकारचा संदेश देण्यासाठी योग्य दिवस आहे”. शरद पवारांनी यावेळी १४ तारखेला बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीलाही एक दिवा संविधानाचा लावून साजरी करुयात असं आवाहन केलं.

“१४ तारखेला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. महिनाभर आपण ती साजरी करतो. पण यावेळी आपण एक दिवा संविधानाचा लावून त्यांची जयंती साजरी करुयात. जयंतीला उत्सवाचं स्वरुप येणार नाही याची खबरदारी घेऊयात. गर्दी टाळूया तसंच एकमेकांमध्ये किमान अंतर राहील याची काळजी घेऊया आणि सर्व परिस्थितीवर मात करुयात,” असं शरद पवारांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले की, “बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलताना एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे बाबासाहेबांनी कधीही अंधश्रद्धेला समर्थन दिलं नाही”. कधीही अंधश्रद्धेच्या मागे जाऊ नका. माणसानं चिकित्सक असं पाहिजे. अंधश्रद्धेचं समर्थन करु नका असं यावेळी शरद पवारांनी सांगितलं. शरद पवारांनी यावेळी मुस्लीम समाजालाही शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नका असं आवाहन केलं.

आणखी वाचा- तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देण्याची गरज नव्हती – शरद पवार

तबलिगी जमातच्या कार्यक्रमावर बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की, “खरं तर अशा परिस्थितीत कार्यक्मर घेण्याच गरज नव्हती. त्यांना परवानगी देण्याची गरज आहे. महाराष्ट्रात कार्यक्रम घेण्यासाठी विनंती करण्यात आली होती. पण आपल्याकडे ती परवानगी नाकारण्यात आली. दिल्लीतही महाराष्ट्राप्रमाणे परवानगी नाकारली असती तर टीव्हीवरुन वारंवार एखाद्या वर्गाला, समाजाच्या संबंधी एक चित्र मांडून सांप्रदायिक कलह वाढेल की काय अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे. ती संधी मिळाली नसती”.

आणखी वाचा- “प्राण्यांनाही दिवे पोहोचविले होते का?; जंगल, दऱ्या खोऱ्यात, पर्वत रांगांमध्येही दिवे लागले”

“सोलापुरात एका गावी बैल गाडी शर्यत पार पडली. अशा सोहळा करायची गरज नव्हती. पण आनंद आहे की पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे तो प्रकार तिथेच थांबला. तशी तत्परता दिल्लीत दाखवली असती तर आज जे पहायला मिळातंय ते पुन्हा पुन्हा पहायला मिळालं नसतं. दिल्लीत जे काही घडलं ते रोज टीव्हीवर दाखवण्याची गरज आहे का ? त्यातून आपण काय परिस्थिती निर्माण करु पाहत आहोत. याचा विचार करण्याची वेळ आहे. जाणकार लोक याबद्दल खबरदारी घेतील,” असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं.