16 November 2019

News Flash

माझ्यासारख्या अडाण्याकडे मुख्यमंत्री ट्युशनला येणार नाही : अजित पवार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे ट्यूशन लावावी, असा सल्ला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे ट्यूशन लावावी, असा सल्ला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. याबाबत पुण्यामध्ये पत्रकारांनी अजित पवार यांना छेडलं असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझ्यासारख्या अडाण्याकडे ट्युशनला येणार नाहीत असं पवार म्हणाले.

तीन वर्षे अभ्यास करुनही राज्यातील प्रश्न सुटत नाहीत. मुख्यमंत्र्यांना चांगले सरकार चालवण्यासाठी ट्यूशन लावण्याची गरज आहे. राज्यात अजित पवार यांच्याइतकी चांगली ट्यूशन कोणीच घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी अजित पवारांकडे शिकवणी लावावी, त्यांची फीसुद्धा आम्ही घेणार नाही, अशी टिप्पणी सुप्रिया सुळे यांनी केली होती. याबाबत आज पुण्यामध्ये पत्रकारांनी अजित पवारांना छेडलं असता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उच्च विभूषित आहेत, त्यामुळे ते माझ्यासारख्या अडाण्याकडे ट्युशनला येणार नाही असं पवार म्हणाले. तसंच, माझ्या बहिणीने केवळ प्रेमापोटी ते वक्तव्य केलं होतं असंही पवार म्हणाले.

जर एखादा विद्यार्थी एकाच वर्गात तीन-तीन वर्ष बसून अभ्यास करत असेल, आणि तरीही तो पास होत नसेल, तर त्याला आपण ट्यूशन लावतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तीन वर्ष झाली तरी ते अजून अभ्यासच करत आहेत. त्यांना खऱ्या अर्थाने ट्यूशनची गरज आहे, असा सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

First Published on May 31, 2018 7:54 pm

Web Title: devendra fadanvis wont come for tuition at me says ajit pawar