राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून फिरतीवर असलेल्या फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली. त्यानंतर उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात भरती झाले. यानिमित्तानं फडणवीस यांचा गिरीश महाजन यांच्यासोबतचा संवाद चर्चेत आला आहे.

देवेंद्र फडणवीस यांना करोनाचं निदान झालं. त्यानंतर त्यांना मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. करोना झाल्याची माहिती त्यांनी स्वतःच ट्विटवरून दिली होती. दरम्यान, राज्यावर करोनाचं संकट ओढवल्यानंतर काही महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्याशी संवाद करताना करोना झाल्यानंतर कुठे उपचार करण्यात यावेत, याविषयी सांगितलं होतं. आज (२४ ऑक्टोबर) फडणवीस हे करोना झाल्यानंतर सरकारी रुग्णालयात दाखल झाले आणि त्या संवादाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे फडणवीसही म्हणाल्याप्रमाणे करोना उपचारासाठी मुंबईतील सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात दाखल झाले.

Kishori Pednekar, pre-arrest bail,
करोना वैद्यकीय साहित्य खरेदीतील गैरव्यवहार प्रकरण : पोलिसांच्या ना हरकतीनंतर किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन
Police dressed as priests in Uttar Pradesh
अन्वयार्थ : पोलीस पुजारी.. की पुजारी पोलीस!
ED and CBI have been the operatives of Narendra Modi in the country for the last 10 years says nana patole
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ईडी व सीबीआय हे कार्यकर्ते; नाना पटोले म्हणतात, “त्यांच्या वॉशिंग मशीनमध्ये…”
Ramdas Athawale
तर भाजपसोबत माझी ‘ए’ टीम : रामदास आठवले

काय होतं फडणवीस-महाजन यांच्यातील संभाषण?

“नेते मंडळी, मंत्रिमंडळातील सदस्य, धनदांडगे मंडळी आहेत. ते ब्रिच कँडीमध्ये दाखल होतात. त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यामुळे ते अॅडमिट होऊ शकतात, पण सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे. साहेबांनाही (देवेंद्र फडणवीस) तेच वाटत होतं, की ठीक आहे कोणी ब्रिच कँडीला दाखल होईल. कोणी लिलावतीला होईल. कोणी जसलोकला होईल. कोणी बॉम्बे हॉस्पिटलला होईल. नेते मंडळी आहेत. आमदार-खासदार, मंत्री आहेत. पण मला जर करोना… होऊ नये, होणार नाही, पण करोनाची लागण झाली, तर मुंबईच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये, सेंट जॉर्जमध्येच दाखल करा”, असं फडणवीस यांनी महाजन यांना सांगितलं होतं. ही ऑडिओ क्लिप त्यावेळी सोशल मीडियात व्हायरलही झाली होती. त्याचबरोबर या संभाषणाला गिरीश महाजनानींही दुजोरा दिला होता.