महापालिका आयुक्त नामदेव भोसले यांच्यावरील हल्ल्यानंतर महिनाभर फरार असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष व नगरसेवक मनोज मोरे याच्यासह स्थायी समिती सभापती सोनल िशदे आणि इतर पाच जणांना बुधवारी शहर पोलिसांनी अटक केली.
१३ एप्रिल रोजी शहरातील माधवपुरा भागात जलवाहिनी टाकण्याच्या विषयातून वाद निर्माण झाला होता. मोर्चा घेऊन पालिकेत आलेल्या सत्ताधारी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह इतर काही जणांनी आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांना धक्काबुक्की केली होती. या प्रकरणी शहर पोलिसात आयुक्त भोसले यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष तथा नगरसेवक मनोज मोरे, स्थायी समिती सभापती सोनल िशदे, माजी नगरसेवक संजय वाल्हे, नगरसेविका मायादेवी परदेशी, विक्की परदेशी यासह ७० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर संशयित फरार होते. तब्बल महिन्यानंतर यातील पाच प्रमुख संशयितांना येथील बस स्थानकासमोर अटक करण्यात आली.