घरात तयार केलेले जेवण घेण्यास रुसलेल्या लहान मुलाने नकार दिल्याने मनस्ताप होऊन पित्याने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. माढा तालुक्यातील मोडनिंब येथे ही घटना घडली.
रामचंद्र नागनाथ शिंदे (३५) असे आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव आहे. तो शेतमजूर होता. दुपारी घरात तयार केलेले जेवण घेण्यास लहान मुलाने नकार दिला. त्याची मनधरणी केली तरी न ऐकता आपला रुसवा कायम ठेवल्यामुळे संवेदनशील पिता रामचंद्र यास प्रचंड मनस्ताप झाला. त्याने लगेचच घरात स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेऊन पेटवून घेतले. यात गंभीर भाजून जखमी झाल्याने त्याला सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता अखेर त्याचा मृत्यू झाला.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jun 2014 रोजी प्रकाशित
मुलाने जेवणास नकार दिल्याने पित्याची आत्महत्या
घरात तयार केलेले जेवण घेण्यास रुसलेल्या लहान मुलाने नकार दिल्याने मनस्ताप होऊन पित्याने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. माढा तालुक्यातील मोडनिंब येथे ही घटना घडली.
First published on: 19-06-2014 at 03:59 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Father committed suicide due to child denying food