27 January 2021

News Flash

करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती लपवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे झाला प्रकार उघड

(प्रतिकात्मक छायाचित्र)

करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतरही प्रशासनाला व ग्रामस्तरीय समितीला माहिती न देता, आजार झाल्याचे लपवून दुसऱ्याच्या घरात लपून बसल्याप्रकरणी गोवे (लिंब, ता. सातारा) येथील एकावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच, स्वत:हून घरी विलीगीकरणात राहण्याचा निर्णय संबंधिताच्या चांगलाचा अंगलट आला आहे. याबाबत ग्रामविकास अधिकारी रमेश बबन ओव्हाळ (रा. म्हसवे, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, संबंधीत व्यक्तीचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, याबाबतची कोणीतीही सूचना न देता या व्यक्तीने गावात प्रवेश केला. शिवाय, विलगीकरण कक्षात न जाता व दक्षता समितीला कोणतीही सूचना दिली नाही. यानंतर स्वत:च्या घरात न राहता गावातील नातेवाईकाच्या घरातच स्वतःचे विलगीकरण करून घेतले.

संबधित नातेवाईकाचे घर रिकामे असल्याने,या घरातून मोठमोठ्याने खोकण्याचा आवाज आल्याने शेजाऱ्यांनी याबाबत शहानिशा केली. त्यानंतर हा प्रकार समोर आला. याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर ग्रमास्तरीय समितीच्या सदस्यांनी जाऊन माहिती घेतली व या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार बागवान अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 12:48 pm

Web Title: filed a case beacuse of concealment information of corona positive report msr 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निवड
2 विधिमंडळात अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव
3 सांगलीचे भाजपा खासदार करोनाबाधित
Just Now!
X