मी भाजपा सोडणार या अफवांवर विश्वास ठेवू नका असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. भाजपाच्या नेत्यांनी उपोषणाला पाठिंबा दिल्याबद्दल पंकजा मुंडे यांनी सगळ्यांचे आभार मानले आहेत. कार्यकर्ते सध्या चांगलं वागत आहेत, विरोधात असताना तुम्ही चांगलं वागता का? त्यामुळे विरोधातच बसावं का? असा मिश्किल प्रश्नही पंकजा मुंडे यांनी विचारला. नव्या सरकारकडून चांगल्या अपेक्षा आहेत. मी १०० दिवसात काही त्यांच्यावर टीका करणार नाही असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. मी मराठवाड्यात समाजसेविका म्हणून काम करणार असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. ठाकरे सरकारने इथला प्राणी प्रश्न सोडवला पाहिजे. तसंच आमच्यापेक्षा चांगलं काम करुन दाखवा असंही आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे. मराठवाड्यातले शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उद्धव ठाकरे चांगलं काम करतील असाही विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी पंकजा मुंडे यांनी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण यापुढे काम करणार असल्याचंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.