चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव येथील जनता विद्यालयाने तयार केलेल्या ‘जलक्रांती’ या उपकरणास जिल्हा परिषद आणि जिल्हा विज्ञान अध्यापक संघ यांच्या वतीने अंजनेरी येथील ब्रह्मा व्हॅलीत आयोजित जिल्हा प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक मिळाला.
या उपकरणाची निवड राज्य स्तरावर होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनासाठी करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग सभापती ज्योती माळी, शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे, बाळासाहेब माळी, आर. पी. पाटील आदींच्या हस्ते संबंधित विद्यार्थी व शिक्षकांना गौरविण्यात आले. या उपकरण निर्मितीसाठी प्राचार्य व जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब पवार यांचे मार्गदर्शन लाभले. या उपकरणाची निर्मिती संकल्पना विज्ञान शिक्षक संदीप भोये, एच. जी. मनियार, आर. एम. मोरे, एस. डी. आहेर, के. पी. शिंदे, ए. व्ही. निकम, एम. आर. चव्हाण यांची होती. उपकरण सादरीकरण ऋतुजा पाचोरकर, तेजश्री आहेर यांनी केले. एस. व्ही. गिरी आणि यू. ए. सादडे यांनी मार्गदर्शन केले.