उत्साहाने पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन ‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय स्पर्धेच्या नगर केंद्रावरील अंतिम फेरीत पेमराज सारडा महाविद्यालयाची (नगर) ‘कोंडवाडा’ ही एकांकिका पहिली आली. मुंबई येथे दि. २० डिसेंबरला होणाऱ्या स्पर्धेच्या महाअंतिम स्पर्धेसाठी या एकांकिकेची निवड झाली आहे. अंतिम फेरीत ‘चिमणी चिमणी खोपा दे’ (अहमदनगर महाविद्यालय) आणि ‘उद्ध्वस्त घरटं’(संजीवनी महाविद्यालय, कोपरगाव) या एकांकिकांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत व भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ आंतर महाविद्यालयीन स्पर्धेची नगर विभागीय अंतिम फेरी मंगळवारी पार पडली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मंजूषा गुंड व उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पितळे, ‘लोकसत्ता’चे मुख्य वितरक सुभाष भांडे, सामाजिक कार्यकर्ते शरद काळे या वेळी उपस्थित होते. श्रीराम रानडे (पुणे), मकरंद खेर व पी. डी. कुलकर्णी (दोघेही नगर) यांनी या एकांकिकांचे परीक्षण केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे आहे. सवरेत्कृष्ट दिग्दर्शक- श्रुती देशमुख (‘चिमणी चिमणी खोपा दे’, अहमदनगर महाविद्यालय), सवरेत्कृष्ट लेखक- अमोल साळवे (कोंडवाडा, पेमराज सारडा कॉलेज, नगर), सवरेत्कृष्ट अभिनय- अनुजा पटाईत (चिमणी चिमणी खोपा दे, अहमदनगर महाविद्यालय) आणि श्रावणी एडके (कोंडवाडा, पेमराज सारडा महाविद्याय), सवरेत्कृष्ट प्रकाश योजना- विकास लोखंडे, अक्षय चौधरी (कोंडवाडा, पेमराज सारडा महाविद्यालय), सवरेत्कृष्ट नेपथ्य- आश्लेषा कुलकर्णी (कोंडवाडा, पेमराज सारडा महाविद्यालय) आणि सवरेत्कृष्ट संगीत- शशिकांत धाडगे (‘चिमणी चिमणी खोपा दे’, अहमदनगर महाविद्यालय).