News Flash

कोकण रेल्वेची विनातिकीट प्रवाशांवर कारवाई

कोकण रेल्वे मार्गावरील निरनिराळ्या गाडय़ांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या ८२ प्रवाशांवर तपासनीसांनी कारवाई करून २६ हजार ३३३ रुपयांचा दंड वसूल केला.

| February 21, 2014 12:25 pm

कोकण रेल्वे मार्गावरील निरनिराळ्या गाडय़ांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या ८२ प्रवाशांवर तपासनीसांनी कारवाई करून २६ हजार ३३३ रुपयांचा दंड वसूल केला. कोकणातून मुंबईत ये-जा करण्यासाठी अतिशय सोयीचे असलेल्या कोकण रेल्वेच्या निरनिराळ्या गाडय़ांमधून अनेकजण विनातिकीट प्रवास करतात, अशी तक्रार होती. त्याआधारे रेल्वेच्या तिकीट तपासनीसांनी एकाच दिवशी मत्स्यगंधा एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, रत्नागिरी दादर पॅसेंजर, दिवा-सावंतवाडी व सावंतवाडी-दिवा पॅसेंजर या गाडय़ांमध्ये तिकीट तपासण्याची धडक मोहीम घेतली. त्यामध्ये हे प्रवासी विनातिकीट असल्याचे उघडकीस आले. त्यांच्याकडून जागेवर दंड वसूल करण्यात आला.
मडगाव-मंगळूर दरम्यान इंटरसिटी एक्स्प्रेस
कोकण रेल्वेमार्गावरील मडगाव ते  मंगळूर या स्थानकांदरम्यान येत्या सोमवारपासून (२४ फेब्रुवारी) सुपरफास्ट इंटरसिटी एक्स्प्रेस नियमितपणे धावणार आहे. या नवीन गाडीला २३ फेब्रुवारी रोजी एका खास कार्यक्रमात हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. मंगळुरु येथून ही गाडी त्या दिवशी सकाळी सव्वाआठ वाजता निघणार असून दुपारी दोन वाजता मडगावला पोचणार आहे. त्यानंतर दुपारी सव्वाचार वाजता ही  गाडी मडगावहून निघून रात्री दहा वाजता मंगळुरुला पोचणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2014 12:25 pm

Web Title: konkan railway action on without ticket passengers
टॅग : Konkan Railway
Next Stories
1 खामगाव अर्बन बँकेचा सरकारकडे अपात्र लाभार्थीचा कोटय़वधींचा भरणा
2 महसूल खात्याचा ‘सहधारक’ शेतकऱ्यांसाठी मात्र कटकटीचा
3 शहर स्वच्छता आराखडय़ाच्या अंमलबजावणीत मनपाची दिरंगाई
Just Now!
X