बुधवारी रात्री उशिरा माळशेज घाटात दरड कोसळली. ही दरड हटवण्याचं काम सुरू असून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. माळशेज घाटातील बोगद्याजवळ ही दर कोसळली आहे. पहाटेपासूनच दरड हटवण्याचे काम सुरू आहे. दरड कोसळल्यानंतर वाहतूक एकेरी मार्गाने सुरू होती. आता दरड हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

दरम्यान पावसाळी पर्यटनसाठी घाटात जाणाऱ्या पर्यटकांनी या घटनेतून बोध घेण्याची गरज आहे. कारण पावसाळा म्हटला की माळशेज घाटात पर्यटकांची गर्दी होतेच. अशात जर दरड कोसळली तर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पावसाळ्यात माळशेजला जायचं प्लानिंग करत असाल तर थोडी सावधगिरी नक्की बाळगा.