महाराष्ट्रात मागील २४ तासात १० हजार ७२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत २ लाख ६६ हजार ८८३ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६१.८२ टक्के इतकं झालं आहे. राज्यात ९ हजार ६०१ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहेत. राज्यात ३२२ करोना बाधितांचा मृत्यू मागील २४ तासांमध्ये झाला आहे. तर राज्यातील मृत्यू दर ३.५५ टक्के झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २१ लाख ९४ हजार ९४३ नमुन्यांपैकी ४ लाख ३१ हजार पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९ लाख ८ हजार ९९ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३८ हजार ९४७ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात सध्याच्या घडीला १ लाख ४९ हजार २१४ अॅक्टिव्ह आहेत. आज राज्यात ९ हजार ६०१ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांची संख्या ४ लाख ३१ हजार ७१९ इतकी झाली आहे.

प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या

मुंबई – २० हजार ७३१
ठाणे – ३१ हजार ९४६
पालघर- ५ हजार ९५१
पुणे- ४६ हजार ३४५
सातारा १ हजार ५५९
कोल्हापूर- ३ हजार ८५९
नाशिक- ५ हजार ६३१
औरंगाबाद- ४ हजार ९४३
नागपूर- ३ हजार १३३

मुंबईत १०५९ नवे करोना रुग्ण

मुंबईत १०५९ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. सध्याच्या घडीला मुंबईतल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही २० हजार ७४९ इतकी आहे. तर मुंबईत आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन ६ हजार ३९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आत्तापर्यंत ८७ हजार ९०६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.