महाराष्ट्रात १८ हजार ३९० नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंतची राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२ लाख ४२ हजार ७७० इतकी झाली आहे. मागील २४ तासांमध्ये २० हजार २०६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या संख्येमुळे आत्तापर्यंत ९ लाख ३६ हजार ५५४ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात २ लाख ७२ हजार ४१० अॅक्टिव्ह केसेस आहेत. मागील चोवीस तासांमध्ये ३९२ मृत्यू झाले आहेत. या संख्येमुळे महाराष्ट्रातील करोनामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या ३३ हजार ४०७ इतकी झाली आहे.
Maharashtra reports 18,390 new #COVID19 cases, 20,206 recovered cases & 392 deaths in the last 24 hours, taking total positive cases to 12,42,770 till date, including 2,72,410 active cases, 9,36,554 discharges & 33, 407 deaths: State Health Department, Govt of Maharashtra pic.twitter.com/1c542Qc91b
— ANI (@ANI) September 22, 2020
महाराष्ट्रात मागील चोवीस तासांमध्ये २० हजार २०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजवर राज्यात ९ लाख ३६ हजार ५५४ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ७५.३६ टक्के इतका झाला आहे. आजवर तपासण्यात आलेल्या ६० लाख १७ हजार २८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १२ लाख ४२ ७७० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८ लाख ७० हजार २०० व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३४ हजार ९८२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.
राज्यातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या
मुंबई – २६ हजार ७६४
ठाणे २८ हजार ८९४
पालघर ६ हजार ३
रत्नागिरी २ हजार ८६९
पुणे ५९ हजार ७७४
सांगली १० हजार ५५७
सातारा ८ हजार ८९२
नाशिक १४ हजार ५
औरंगाबाद ८ हजार ९५५
नागपूर १९ हजार १४१
आज नोंद झालेल्या ३९२ मृत्यूंपैकी २४३ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर ८१ मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित ६८ मृत्यू एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीतले आहेत असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं.