News Flash

मान्सून अपडेट : महाराष्ट्रात उद्या मुसळधार पावसाचा अंदाज

पुण्यात मेघगर्जनेसह बरसणार

संग्रहित छायाचित्र

राज्यात पावसाने दमदार आगमन केले असून, उद्या गोव्यासह, महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता पुणे वेध शाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यातील बहुतांश भागात या महिन्याच्या सुरुवातीला पावसाचे दमदार आगमन झाले. मात्र मागील काही दिवसात विश्रांती घेतलेल्या पाऊस आता गोव्यासह महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार बरसणार असल्याचा अंदाज पुणे वेध शाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पुण्यात मेघगर्जनेसह लावणार हजेरी

पुणे शहरात आज (२८ जून) दुपारनंतर पावसाचे दमदार आगमन झाले असून, उद्या (२९ जून) मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता पुणे वेध शाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे. तर ३० जून ते ४ जुलैपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 9:36 pm

Web Title: monsoon update heavy rainfall predicted in some part of maharashtra bmh 90 svk 88
Next Stories
1 बारा बलुतेदारांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करा
2 परस्पर अंतर राखण्यासाठी खास उपकरण
3 पुण्यात करोनाचा कहर, दिवसभरात तब्बल ८२२ नवे रुग्ण, १९ जणांचा मृत्यू
Just Now!
X