महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये १९ हजार ५१७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत १३ लाख १६ हजार ७६९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. या संख्येमुळे राज्याचा रिकव्हरी रेट हा ८४. ७१ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात आज १० हजार ५५२ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये १५८ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर हा २.६३ टक्के इतका आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७८ लाख ३८ हजार ३१८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५ लाख ५४ हजार ३८९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३ लाख ८० हजार ९५७ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर २३ हजा १७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात १ लाख ९६ हजार २८८ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. आज राज्यात १० हजार ५५२ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या १५ लाख ५४ हजार ३८९ इतकी झाली आहे.

महत्त्वाची शहरं आणि अॅक्टिव्ह केसेस

मुंबई- २३ हजार ८२८
ठाणे- ३० हजार ९३२
पुणे-४० हजार ३१६
रत्नागिरी-१ हजार ६४५
सातारा-७ हजार ६६४
कोल्हापूर- ३ हजार ३०१
सोलापूर ४ हजार १५७
नाशिक-१३ हजार ६२०
औरंगाबाद- ४ हजार २३८
नागपूर- ८ हजार १७१