News Flash

मॉर्निंग बुलेटिन : वाचा महत्त्वाच्या बातम्या

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि इतर महत्त्वाच्या बातम्या

१. मोदी भेटीचा हट्ट धरणा-या तृप्ती देसाईना पुण्यात अटक

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तृप्ती देसाई शिर्डीला जाण्यासाठी निघाल्या होत्या. वाचा सविस्तर..

२. धक्कादायक! गरबा खेळून घरी परतणाऱ्या ११ वर्षाच्या मुलीवर मुंबईत बलात्कार

गरबा खेळून घरी परतणाऱ्या एका ११ वर्षाच्या मुलीवर टेम्पो चालकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईत साकीनाका परिसरात घडली आहे. वाचा सविस्तर..

३. ‘तानाजी’ चित्रपटात सलमान साकारणार शिवाजी महाराजांची भूमिका?

अभिनेता अजय देवगण ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट घेऊन येतोय. चित्रपटाच्या घोषणेपासूनच यातील कलाकारांविषयी उत्सुकता निर्माण झाली. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, या ऐतिहासिक चित्रपटामध्ये सलमान खान विशेष भूमिका करणार आहे. वाचा सविस्तर..

४. तुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू – उद्धव

अयोध्येत राममंदिराची उभारणी करणे सरकारला जमत नसेल, तर तसे जाहीर करावे. आम्ही ते उभारू, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात केली. वाचा सविस्तर..

५. राममंदिरासाठी कायदा हवा!, सरसंघचालक मोहन भागवत यांची सूचना

रामजन्मभूमीच्या ठिकाणी राममंदिर होते हे पुराव्यांनिशी सिद्ध झाले आहे. त्या ठिकाणी लवकरात लवकर राममंदिर उभारण्याची आवश्यकता आहे. मात्र, काहीजण स्वार्थासाठी राजकारण करून आणि न्यायालयात याचिका दाखल करून राममंदिरात अडथळे आणत आहेत. त्यामुळे सरकारने कायदा करून राममंदिर बांधावे, अशी सूचना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी केली. वाचा सविस्तर..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 9:39 am

Web Title: morning bulletin five important news trupti desai ajay devgn taanaji salman khan
Next Stories
1 हिंदू उमेदवारांनी मला प्रचारासाठी बोलावणं बंद केलं आहे – गुलाम नबी आझाद
2 शबरीमाला मंदिरात इतिहास घडणार? दोन महिला पोहोचल्या मंदिर परिसरात
3 भारतामध्ये वर्षभरात वाढले ७,३०० करोडपती
Just Now!
X