मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

१. 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतरही वायुसेनेला पाकवर करायचा होता एअर स्ट्राईक पण…

भारतीय वायुसेनेने मंगळवारी पहाटे पाकिस्तानात कारवाई करत मिराज 2000 या विमानांच्या साथीने दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. देशभरात वायुदलाचं कौतुक होतं आहे. एवढंच नाही तर ही कृती योग्यच आहे असं मत देशातल्या सगळ्याच नेत्यांनी आणि जनतेनेही नोंदवलं आहे. अशात वायुसेनेच्या एका माजी वैमानिकाने एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. वाचा सविस्तर..

२. ‘जैश’ला २४ तासांमध्ये दुसरा दणका, काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 

भारतीय वायूसेनेकडून दहशतवादी तळ नष्ट केल्याच्या २४ तासानंतरही पाकिस्तानची खुमखुमी कमी झाल्याचे दिसत नाही. जम्मू-काश्मीरमधील शोपियाँ येथे भारतीय सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. वाचा सविस्तर..

३. Surgical Strike 2: दिल्ली, मुंबईसह इतर पाच शहरं हाय अलर्टवर

भारतीय वायुदलाने मंगळवारी पहाटे एअर स्ट्राईक करून पुलवामा येथील हल्ल्याचा बदला घेतला. या हल्ल्यात 200 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेल्याचा दावा कऱण्यात आला आहे. दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली, मुंबईसह इतर पाच शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाचा सविस्तर..

४. राज्याचा आज अंतरिम अर्थसंकल्प

राज्याचा वर्ष २०१९-२०चा अंतरिम अर्थसंकल्प आज (बुधवारी) दुपारी २ वाजता विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सादर केला जाणार आहे. अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर हे विधान परिषदेच्या सभागृहात अर्थसंकल्प मांडतील. वाचा सविस्तर..

५. Air Strike नंतर पाकिस्तानकडून गोळीबार, नियंत्रण रेषेजवळ पाच जवान जखमी

जम्मू काश्मीरच्या अखनूर केरी भागात पाक सैन्याने हल्ला आणि गोळीबार केला आहे. नियंत्रण रेषेजव भारताचे पाच जवान जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. वाचा सविस्तर..