09 March 2021

News Flash

शरद पवारांचे खंदे समर्थक भाजपात

राष्ट्रवादीला मोठा धक्का

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. (संग्रहित छायाचित्र)

शरद पवारांचे खंदे समर्थक गुलाबराव चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विध्यमान संचालक गुलाबराव चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत भाजपात प्रवेश केला आहे. भाजपा खासदार नारायण राणे यांच्या मालवणमधील निवासस्थानी त्यांचा पक्षप्रवेश झाला. गुलाबराव चव्हाण हे राष्ट्रवादी कॉग्रेंसचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे समर्थक मानले जात होते.

नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली गुलाबराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला असून राष्ट्रवादी सह सिंधुदुर्गच्या सहकार क्षेत्राला खिंडार पाडले आहे. गुलाबराव चव्हाण सध्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालकपदावर आहेत. गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ ते सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम करत आहेत. आता त्यांच्या भाजपा प्रवेशाने जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नारायण राणे यांच्या निलरत्न या बंगल्यावर गुलाबराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी त्यांचे स्वागत माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, खा.नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आम.नितेश राणे, यांनी पुष्पगुच्छ, भाजपाचा झेंडा देऊन केले. यावेळी माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, भाजपा जिल्हाअध्यक्ष राजन तेली,आमदार प्रसाद लाड यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2020 4:24 pm

Web Title: ncp sharad pawar gulabrav chavan bjp devendra fadnvis nck 90
Next Stories
1 महाभरतीमध्ये भाजपात गेलेले नेते पुन्हा राष्ट्रवादीच्या मार्गावर; प्रवक्त्यांनी दिली माहिती
2 मुंबईत आता आवाजावरून होणार कोविड टेस्ट; करोनाला रोखण्यासाठी BMCचं महत्त्वाचं पाऊल
3 विशेष : दुर्मिळ होत चाललेली गोष्ट! कधीही पक्षांतर न करता ते अकरा वेळा आमदार झाले
Just Now!
X