08 July 2020

News Flash

भिडेगुरूजी, शिवप्रतिष्ठानला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर चालण्यास परवानगी नाही

पुणे पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे

संभाजी भिडे आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर चालण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. पालखी सोहळा समितीच्या वतीने पुणे पोलिसांना पत्र देण्यात आलं आहे. पालखी सोहळ्यात कुणीही घुसू नये अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. संभाजी भिडे आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोरून चालण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. पुणे पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. पालखीच्या पाठीमागून संभाजी भिडे किंवा शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते चालू शकतात असंही पोलिसांनी म्हटलं आहे. मात्र समोरून चालण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.

परंपरागत पद्धतीने चालत आलेला दिंड्यांचा क्रम कायम राहवा असं मत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुखांनी पुन्हा एकदा मांडलं. त्यानंतर पोलिसांनी भिडे गुरुजी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पालखी सोहळ्याच्या पुढे चालता येणार नाही हे स्पष्ट केलं. त्यामुळे उद्या संभाजी भिडे गुरुजी आणि त्यांचे समर्थक पुण्यातील जंगली महाराज मंदिरात जमतील आणि सर्व पालख्या पुढं गेल्यावर सोहळ्यात सहभागी होऊन शिवाजी नगर चौक ते डेक्कनच्या संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत चालत जातील.

यापूर्वी शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते आषाढी वारीसाठी निघालेल्या पालखी सोहळ्यात सहभागी होत असत. वारकऱ्यांसोबत धारकरीही जात असत. मात्र दोन वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि तुकाराम महाराजांची पालखी यांच्या पालखी मार्गात वाद झाला होता. त्यावेळी शिवप्रतिष्ठानचे काही कार्यकर्ते दिंडीच्या पुढे येऊन मार्गक्रमण करू लागले. यावर दिंडीतील प्रमुखांनी आक्षेप घेतला. त्यामुळे गेल्या वर्षीपासून शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना पालखी मार्गात येण्यास मज्जाव करण्यात आला. यावर्षीही हा विरोध कायम आहे.

दोन्ही पालख्यांचे पुण्यात आगमन झाल्यानंतर अखेरच्या दिंडी मागे संभाजी भिडे गुरुजी यांच्यासह आम्ही सहभागी होणार असल्याची माहिती शिव प्रतिष्ठान जिल्हा अध्यक्ष संजय जढर यांनी दिली आहे. आम्हाला पालखी सोहळ्यात सहभागी होण्यापासून परवनगी नाकारल्याच्या वृत्तामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. गेल्या वर्षीप्रमाणे पालखी सोहळ्यात कोणत्याही प्रकारचे शास्त्र घेऊन सहभागी होऊ नका. अशा स्वरूपाची नोटीस पाठविण्यात आली आहे. पोलिसानी दिलेल्या आदेशाचे आम्ही पालन करणार असल्याचेही जढर म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2019 11:57 am

Web Title: no permission to walk ahead of dnyaneshwar maharaj palkhi to sambhaji bhide and shiv pratishatn scj 81
टॅग Ashadhi Ekadashi
Next Stories
1 मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आज दुपारी अर्ध्यातासासाठी राहणार बंद
2 पुणे: गर्भवती महिलेला डॉक्टरचा अयोग्य स्पर्श, पोलिसांनी नोंदवला गुन्हा
3 कचरा लाभदायी ठरणार
Just Now!
X