25 January 2021

News Flash

दिल्लीला मागे टाकत पुणे बनलं करोनाबाधितांची राजधानी; देशातील रुग्णसंख्या ३६ लाखांच्या पार

पुणे बनलं देशातील सर्वाधिक रुग्ण संख्या असलेलं शहर

पुणे शहरात सोमवारी १,९३१ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळं पुणे शहरानं करोनाबाधितांच्या संख्येत राजधानी दिल्ली शहरालाही मागं टाकलं आहे. पुण्यातील एकूण रुग्णसंख्या ही १,७५,१०५ इतकी झाली असून दिल्लीची रुग्णसंख्या १,७४,७४८ आहे. त्यामुळे पुणे शहर हे देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या असलेलं शहर बनलं आहे. दरम्यान, देशातील एकूण रुग्णसंख्या ३६ लाखांचा पार पोहोचली आहे. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे.

पुण्यात सध्या देशातील सर्वाधिक ५२,१७२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जे मुंबईतील २०,००० आणि दिल्लीतील १५,००० यांच्यापेक्षा खूपच अधिक आहेत. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात आजवर ४,०६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १,१८,३२४ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याच्या आरोग्यविभागानं ही माहिती दिली आहे.

देशात मार्च महिन्यात कोविड-१९ च्या संसर्गाला सुरुवात झाली तेव्हापासून पुणे जिल्हा प्रशासन यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. राज्यातील पहिला रुग्ण हा पुण्यातच नोंदवला गेला होता. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर काम करीत आहे. मात्र, यामध्ये उद्याप तरी म्हणावं असं यश आलेलं नाही.

दरम्यान, सोमवारी देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३६,२१,२४५ वर पोहोचली. यांपैकी २७,७४,८०१ रुग्ण बरे झाले आहेत. तर आजवर ४ कोटी २३ लाख ०७ हजार ९१४ करोना नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 9:06 am

Web Title: overtaking to delhi pune becomes capital of corona patients countrys total patients mark 36 lakhs aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 …तर भारताची १९६२ पेक्षा जास्त मोठी हानी करू, चीनची धमकी
2 अभिनेता गौरव चोप्राच्या वडिलांचं निधन
3 India China Clashes: भारताचा चीनला शह, पँगाँग सरोवराजवळील मौक्याचा प्रदेश घेतला ताब्यात
Just Now!
X