01 March 2021

News Flash

खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यंदा शैक्षणिक शुल्क वाढ करु नये – अमित देशमुख

खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणि दंत महाविद्यालय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत केले आवाहन

संग्रहीत

कोविड -19 च्या काळात शासकीय रुग्णालये आणि महाविद्यालयांबरोबरच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनीही सेवाभावी वृत्तीने काम केले असल्याचे सांगत, खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यावर्षी विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शैक्षणिक शुल्कामध्ये कोणतीही वाढ करु नये, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणि दंत महाविद्यालयाच्या संघटनेला केले.

वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख यांनी आज खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणि दंत महाविद्यालय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, एसएनबीटी एज्युकेशनल ट्रस्टचे डॉ. हर्षल तांबे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

यावेळी अमित देशमुख म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांवर फी वाढीचा बोजा लादणे योग्य होणार नाही आणि त्यामुळेच या शैक्षणिक वर्षात कोणतीही अतिरिक्त फी वाढ करण्यात येऊ नये, यासाठी आपण उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी देखील प्रत्यक्ष चर्चा करणार आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 6:23 pm

Web Title: private medical colleges should not increase tuition fees this year amit deshmukh msr 87
Next Stories
1 पराभव साजरा केला तर त्यात गैर काय?-पंकजा मुंडे
2 शरद पवारांनी मराठा आरक्षण प्रश्नावर उत्तर द्यायचं टाळलं
3 फडणवीस आणि अजित पवारांना एकाच वेळी करोनाची लागण, चंद्रकांत पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Just Now!
X