करोना फैलाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. तरीही करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. पुण्यातही करोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण वाढू लागला आहे. यासाठी पुणे महानगरपालिकेनं ब्रेक द चेन अंतर्गत मनपा हद्दीसाठी सुधारित आदेश जारी केला आहे.

ऑक्सिजन पुरवठा करण्याऱ्या कंपन्यांना १०० टक्के पुरवठा हा वैद्यकीय कारणासाठी करण्याचे आदेश देण्यात आलेत. तसेच ऑक्सिजनचा वापर करणारे आणि ऑक्सिजनचा पुरवठा करणारे यांची यादी जाहीर करण्यास सांगितली आहे. त्याबरोबर महाराष्ट्र सरकारने अत्यावश्यक सेवेशी संबंधित उत्पादन करण्याऱ्या कंपन्यांना परवानगी दिली आहे. अश्या कंपन्यांना आवश्यक मालाचा पुरवठा करणारी दुकानं त्याच कारणासाठी सुरु ठेवण्याची परवानगी असणार आहे. मात्र इतर किरकोळ विक्री करता येणार नाही. तसेच काही कर्मचाऱ्यांना नविन आदेशात करोना चाचणीतून सूट देण्यात आली आहे.

  • घरपोच औषधं पोहोचवणारे कर्मचारी
  • हॉटेल, बार, रेस्टॉरंटमधील कर्मचारी, तसेच घरपोच सुविधा देणारे कर्मचारी
  • खासगी वाहतूक करणारे वाहन चालक-मालक
  • वर्तमानपत्र, मासिकं, साप्ताहिकं यांची छपाई आणि वितरण करणारे कर्मचारी
  • घरगुती काम करणारे कामगार, वाहन चालक, स्वयंपाकी
  • ज्येष्ठ नागरिक आणि घरी आजारी असण्याऱ्या लोकांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय मदतनीस आणि नर्स

केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार या कर्मचाऱ्यांनी लसीकरण करुन घ्यावे अशी विनंतीही करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • खानावळी या सकाळी ७ ते संध्याकाळी ८ या वेळेत फक्त पार्सल सेवेसाठी सुरु राहतील
  • मद्य विक्रीची दुकानातून होम डिलिव्हरी सोमवार ते शुक्रवार या दरम्यान सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत करता येणार आहे
  • चष्माची दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत सुरु राहतील

पुणे महापालिकेनं करोनाचा फैलाव रोखण्यासाठी हे सर्व सुधारित नियम लागू केले आहेत. ही नियमावली पुढील आदेशापर्यंत लागू असेल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच नियम मोडल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाईची तरतूद करण्यात आली आहे.