News Flash

कर्नाळा खिंडीत एसटी बस- कारचा अपघात; एक ठार, तीन जखमी

या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. 

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई- गोवा महामार्गावर कर्नाळा खिंडीत एसटी बसला विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव कारने धडक दिल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

कर्नाळा खिंडीत एसटी बस आणि कारचा अपघात झाला. अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. अपघातातील जखमी व मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 2:43 pm

Web Title: raigad car st bus collision at karnala khind 1 killed several injured
Next Stories
1 ‘अच्छे दिन न बघवीते’, राज ठाकरेंच्या व्यंगचित्राला भाजपा समर्थकांचं प्रत्युत्तर
2 स्वतंत्रते न बघवते; राज ठाकरेंचा मोदींवर निशाणा
3 युतीसाठी डिनर डिप्लोमसी! पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंना दिले भोजनाचे निमंत्रण
Just Now!
X